माजी मंत्री महादेव जानकर परभणीच्या आखाड्यातून…सोमवारी रासपचा निर्धार मेळावा 

माजी मंत्री महादेव जानकर परभणीच्या आखाड्यातून… सोमवारी रासपचा निर्धार मेळावा

माजी मंत्री महादेव जानकर परभणीच्या आखाड्यातून... सोमवारी रासपचा निर्धार मेळावा 

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री महादेव जानकर साहेब यांची परभणीच्या लोकसभा निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत.‌ या पार्श्वभूमीवर ११ मार्चला रासपचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. श्रीकृष्ण गार्डन येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. या वेळी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, राष्ट्रीय सचिव सुशील कुमार, राष्ट्रीय सल्लागार. गोविंद सुरनर, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर, विभागीय अध्यक्ष विष्णू गोरे ओमप्रकाश चितळकर, लोकसभा प्रभारी ज्ञानोबा ताठे, सचिन देशमुख विष्णू पायगुडे, विलास गाढवे यांची उपस्थिती राहणार आहे.

माजी मंत्री महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्या अनुषंगाने परभणीत सोमवारी विजय निर्धार मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ठीक दहा वाजता नरसिंह पोखरणी येथून श्री नरसिंहाचे दर्शन घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी चार चाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून गंगाखेड-परभणी या रोडवर परभणी शहरात दाखल दाखल होईल. उड्डाणपुलावरून बस स्थानक अण्णाभाऊ साठे पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले यांचा पुतळा, वसंतराव नाईक यांचा पुतळा या महामानवांना अभिवादन करून वसमत रोडवरील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय दुपारी एक वाजता जाहीर सभा घेण्यात येणार आहे. सेलू तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सचिव प्रभाकर इंगळे याच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाने, पंडित जगाडे जिल्हा सचिव प्रभाकर इंगळे तालुका अध्यक्ष सुदर्शन हातकडके कटारे सुदर्शन, अशोक गोरे, संदीप रोकडे, योगेश डोळझाके, भगवान गायकवाड, सोमेश्वर गिराम, आसाराम राऊत, माणिक शिंदे यांची या वेळी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!