विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार; सेलूतील प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम

सेलू जि.परभणी : आयएमओ परीक्षेतील विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तसेच राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बुधवारी, १३ मार्च रोजी सेलू येथील प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, उपमुख्याध्यापक राजेंद्र जाधव, पालक प्रतिनिधी म्हणून सतीश अवचार, मुंजाभाऊ जाधव, घुमरे, शुभांगी मिटकरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शुभांगी मिटकरी, निशा चंदेल, सतीश अवचार यांनी मनोगत व्यक्त केले. मोरया फाउंडेशनच्या वतीने परभणी येथे आयोजित हंट फॉर ज्युनिअर सांईटिस्ट स्पर्धेत बक्षीस पात्र सोनल क्षीरसागर व जानवी भाबट यांचा तसेच राजेंद्र जाधव गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन दीपा सावंत यांनी केले. सारिका ताठे यांनी आभार मानले.