‘शिवगर्जना’ महानाट्याला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते शुभारंभ

‘शिवगर्जना’ महानाट्याला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते शुभारंभ

परभणी : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि परभणी जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याच्या प्रयोगाला पहिल्याच दिवशी गुरुवारी, २१ मार्च रोजी परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१ ते २३ मार्च या कालावधीत परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल येथे या महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ‘शिवगर्जना’ महानाट्याची सुरुवात करण्यात आली.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व परभणी जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचे सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महानाट्याचा हा प्रयोग सर्व नागरिकांसाठी मोफत आहे. ‘शिवगर्जना’ महानाट्यातील सुमारे २५० हून अधिक कलाकारांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ, आग्रावरुन सुटका, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, पुरदंरचा तह अशा विविध घटनावरील प्रसंगाचे रोमहर्षक आणि चित्तथरारक सादरीकरणांमुळे प्रेक्षकांना शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवता आला आहे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!