कला क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी : प्रभाकर कवाळे; भांगडिया चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूमध्ये गौरव

कला क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी : प्रभाकर कवाळे; भांगडिया चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूमध्ये गौरव

सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम 

सेलू जि.परभणी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे. त्याच बरोबर कला, संगीत क्षेत्रात करिअरसाठी खूप संधी उपलब्ध आहेत, असे मत सेलूचे पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी केले.

दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवारी, २३ मार्च रोजी झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राजेश गुप्ता , पर्यवेक्षक के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विजेत्यांना मान्यवरांच्या पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक आर.डी.कटारे यांनी केले. स्वागत गीत सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने गायले सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. फुलसिंग गावित यांनी आभार मानले.

चित्रकला स्पर्धेचा निकाल असा : गट पाहिला – प्रथम अनुष्का बोराडे (नूतन प्राथमिक शाळा) द्वितीय मनस्वी महाजन (बोर्डीकर पोद्दार लर्न इंग्लिश स्कूल), तृतीय नताशा ठोके (बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल), गट दुसरा – प्रथम संस्कृती आवसकर (नूतन प्राथमिक शाळा), द्वितीय ईश्वरी डोंबे (बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल), तृतीय श्रीशा कदम (बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल), गट तिसरा – प्रथम पार्थ चौधरी (नूतन विद्यालय), द्वितीय सान्वी शितळे (नूतन विद्यालय) तृतीय मनिषा आवसकर (नूतन कन्या प्रशाला) गट चौथा – प्रथम क्षितिजा कैलास खजिने (प्रिन्स अकॅडमी), द्वितीय हर्षदा गलबे (नूतन कन्या प्रशाला) तृतीय प्रथमेश कोरडे (नूतन विद्यालय)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!