थकीत करासाठी बाजार समितीला सील

थकीत करासाठी बाजार समितीला सील

सेलू नगरपालिकेची कारवाई; ९४ लाखांची थकबाकी 

सेलू जि.परभणी : विविध करांसह मालमत्ता कराची ९४ लाख रुपयांच्या कर थकबाकी वसुलीप्रकरणी मंगळवारी, २६ मार्च रोजी सेलू नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत सेलू कृषी बाजार समितीच्या कार्यालयाला सील ठोकले. 

थकबाकीसाठी वसुलीसाठी नोव्हेंबरपासून पालिकेच्या कर वसुली विभागाकडून वारंवार पाठपुरावा करूनही बाजार समितीने कर भरणा केला नाही. यामुळे मुख्याधिकारी देवीदास जाधव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहायक मुख्याधिकारी भगवान चव्हाण, प्रशासकीय अधिकारी उ.बा.चाऊस, कर निरीक्षक नितीन इजाते, मुस्तजाब खान, नितीन धूत, मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तहसील कार्यालय, पाटबांधारे विभाग, महावितरण आदींसह अन्य कार्यालयाकडील थकबाकीसाठी वरिष्ठ कार्यालयमार्फत पाठपुरावा सुरू आहे. स्व-उत्पन्न वाढविण्याचे राज्य सरकारचे पालिकेला स्पष्ट निर्देश आहेत. राज्य सरकारच्या विविध अनुदान प्राप्तीसाठी स्व-आर्थिक उत्पन्नाचे अवलोकन करूनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपालिकेला अनुदान दिले जात आहे. यामुळे स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढविल्याखेरीज दुसरा उपाय नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!