सेलू मार्केट कमिटीचे बीट पूर्ववत चालू करा : उपनिबंधकांकडे संचालकांची मागणी

सेलू मार्केट कमिटीचे बीट पूर्ववत चालू करा : उपनिबंधकांकडे संचालकांची मागणी

सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मासिक सभेमध्ये झालेल्या शिवीगाळ आणि वादाचे पडसाद तसेच व्यापारी संचालकास झालेली मारहाण या कारणामुळे व्यापारी बांधवांनी सेलू मार्केट यार्डमध्ये बीट पुकारणे बंद केले होते. बीट पूर्ववत सुरू करावे अशी मागणी सहायक उपनिबंधकांकडे संचालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

व्यापाऱ्यांना चोर म्हणून अपमान करणाऱ्या संचालकाने माफी मागावी, या कारणास्तव सेलू मार्केट कमिटीचे बीट पुकारणे बंद करण्यत आले होते. याचा परिणाम सेलूतील कापूस व्यापारावर होत आहे. तसेच शेतकरी हवालदिल झाला आहे. एक महिना उलटूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. यामुळे संचालक डॉ.संजय रोडगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा संचालक दत्तराव कदम, अनिल पवार, रामेश्वरजी राठी, शैलेश तोष्णीवाल,गोकर्ण पडघन, गणेश आकात, वर्षा सोळुंके,आनिता ताठे आदींच्या  संचालकांच्या निवेदनावर सह्या आहेत. संबंधित प्रकरणावर पडदा टाकून समन्वय बैठक घडवून सेलू मार्केट कमिटीचे बीट पूर्ववत चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे .शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि हेळसांड बघता संबंधित संचालकानी पुढाकार घेतला आहे. या आधीही काही मार्केट कमिटी व्यवस्थापन आणि व्यापारी यांच्यात वाद झाला होता. संचालकांनी पुढाकार घेत वाद मिटवला होता.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!