नवोदय परीक्षेत आदित्य हळणेचे यश
सेलू : येथील व्हिजन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आदित्य अमोल हळणे यांने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. बीडीएस परीक्षेमध्येही आदित्यने देशात ३९ वा, तर एमटीस परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल आदित्यचा सत्कार करण्यात आला. या वेळी केशवराव बाबासाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, विजय महिफळ, संदीप कवडे आदींची उपस्थिती होती.