सानवी शितळे नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र
सेलू : येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थीनी सानवी गजानन शितळे या विद्यार्थिनीने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परभणी येथील नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी सानवी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल सानवीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.