सेलूतील फिनकिड्सच्या चिमुकल्यांना प्रमाणपत्र वितरण; ग्रॅज्युएशनडे उत्साहात साजरा

सेलूतील फिनकिड्सच्या चिमुकल्यांना प्रमाणपत्र वितरण; ग्रॅज्युएशनडे उत्साहात साजरा

सेलू : येथील सॅनरो एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित फिनकिड्समध्ये ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी चिमुकल्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संचालक डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, पालक प्रतिनिधी प्रशांत ढोके, रामेश्वर काळे व सर्व शिक्षक उपस्थित होते. फिनकिड्सच्या सिनिअर केजी वर्गातील विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते चिमुकल्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत विविध खेळ , डान्स, सेल्फी पॉइंट यासारखे करमणुकीच्या घटकांचा समावेश होता. चिमुकल्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन दिपा सावंत यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!