आदर्श शिक्षक शरद ठाकर यांना पीएचडी
सेलू : सेलू तालुक्यातील केमापूर येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक शरद संदीपान ठाकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी संपादन केली आहे. ‘शेतकऱ्याचे मनोबल वाढवणारी मराठवाड्यातील ग्रामीण कविता : एक अभ्यास १९९० – २०१५’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.अशोक पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकर यांनी संशोधन पूर्ण केले. याबद्दल विविध स्तरांतून ठाकर यांचे अभिनंदन होत आहे.