चिमुकल्यांनी लुटला वासंतिक शिबिराचा आनंद

चिमुकल्यांनी लुटला वासंतिक शिबिराचा आनंद

सेलूतील ‘नूतन’च्या बालवाडी विभागाचा उपक्रम

परभणी : सेलू येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाचे वासंतिक शिबीर १२ ते १८ एप्रिल या कालावधीत उत्साहात पार पडले. शिबिरामध्ये आयोजित विविध उपक्रमांचा चिमुकल्यांनी आनंद लुटला. शिबिरामध्ये कागदी टोपी बनवणे, प्लेट बनवणे, चित्र रंगवणे योगा, नृत्य, वेशभूषा, गाणी गोष्टी आदी उपक्रम घेण्यात आले. रामनवमी उत्सवानिमित्त विविध वेशभूषा सादर करण्यात आल्या. विविध वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ‌‌.एस.एम.लोया, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी मकरंद दिग्रसकर, कोमल दिग्रसकर उपस्थित होते.सुमिता पाठक, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, अनिल रानपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक छाया बोबडे यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा ठाकूर यांनी केले. सुनिता देवकर यांनी आभार मानले. राधा ताठे, संध्या कुलकर्णी, मीना होलिया, अनुपमा पवार, भक्ती भांडवले, रेणुका गात आदीसह पालक, शिक्षकांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!