नूतन प्राथमिक शाळेचे वासंतिक शिबिर उत्साहात
योगा, हस्तकला, नृत्य, मतदान जागृतीसह विविध उपक्रम
सेलू : सेलू येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या छंदआनंद वासंतिक शिबिराचा समारोप २० एप्रिल रोजी झाला. यानिमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या मतदान जनजागरण फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळक पुतळ्याला जवळ शिबिरार्थींनी पथनाट्य सादर केले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत राजूरकर, वंदना पिंपळगावकर, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर, सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, सुहास नवले यांची उपस्थिती होती. शिबिरात योगासने, प्रार्थना, पसायदान, श्लोक, प्रयोग, कार्टूनद्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन, मतदान जनजागृती पथनाट्य, बोधात्मक कथा, गाणी, गोष्टी, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, कापसापासून विविध वस्तूंची निर्मिती, तज्ञांचे मार्गदर्शन, हस्तकला विविध टाळ्यांचे प्रकार आदी उपक्रमांमध्ये शिबिरार्थी दंग झाले. शिबिरार्थींच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, डॉ.विजेंद्र नागोरी, प्राचार्य डॉ.यु.सी.राठोड उपस्थित होते. प्रास्ताविक सोनाली कुबेर यांनी केले. सूत्रसंचालन आर्या कुलकर्णी यांनी केले. शिबिरासाठी रामकोर कुंभार, महादेव बोरकर, सविता डाफणे, कल्पना चौधरी रेखा डोळस, शितल शेळके, संपदा जहांगीरदार, मनीषा गजमल, बाली शिंदे, सुशील डुकरे, प्रल्हाद पवार यांनी परिश्रम घेतले.