वाचन सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सेलूतील नूतन कन्या शाळेचा उपक्रम
या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुरेश हिवाळे म्हणाले, ” पुस्तके माणसाचे विचार प्रगल्भ करतात. विचारांच्या कक्षा रुंदावतात. सौंदर्याची सृष्टी आणि विचारांची दृष्टी देतात. ग्रंथास आपले सोबती केले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.शरद कुलकर्णी म्हणाले की, वाचन चळवळ समृद्ध व्हायला हवी. ती रुजायला हवी. वाचन हा छंद आणि जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा. वाचाल तरच वाचाल.
परभणी : सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन सप्ताहाला विद्यार्थ्यिंनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवरील पुस्तके वाचनाची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली. समारोपप्रसंगी संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश हिवाळे मुख्याध्यापिका उज्ज्वला लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी हिवाळे म्हणाले, ” पुस्तके माणसाचे विचार प्रगल्भ करतात. विचारांच्या कक्षा रुंदावतात. सौंदर्याची सृष्टी आणि विचारांची दृष्टी देतात. ग्रंथास आपले सोबती केले पाहिजे. याप्रसंगी स्वरा देशपांडे आणि समीक्षा कुलकर्णी या मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.शरद कुलकर्णी म्हणाले की, वाचन चळवळ समृद्ध व्हायला हवी. ती रुजायला हवी. वाचन हा छंद आणि जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा. वाचाल तरच वाचाल. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. बाबासाहेब थोरे, डॉ.यशवंत कुलकर्णी, सुरेखा आगळे, भालचंद्र गांजापूरकर आदींसह शिक्षक, विद्यार्थिनींची उपस्थिती होती