परभणी लोकसभा : भ्रम पसरविणाऱ्यांना जागा दाखवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जानकर यांच्या प्रचारार्थ पाथरीत सभा

परभणी लोकसभा : भ्रम पसरविणाऱ्यांना जागा दाखवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जानकर यांच्या प्रचारार्थ पाथरीत सभा

परभणी लोकसभा : भ्रम पसरविणाऱ्यांना जागा दाखवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जानकर यांच्या प्रचारार्थ पाथरीत सभा

परभणी : मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठीची लढाई ही राजकीय नसून सामाजिक आहे. या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाग  घेतला नाही, त्याबद्दल जरांगे यांचे आभार व्यक्त करीत, परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाने पाठींबा व्यक्त केल्याच्या विरोधकांनी सुरु केलेल्या अफवा सपशेल खोट्या आहेत. केवळ राजकारणापुरता मराठा समाजाचा उपयोग करून घेणाऱ्या आणि निवडणुकीत पाठिंबा दिल्याचा भ्रम पसरविणाऱ्या विरोधकांना मराठा समाजाने जागा दाखवून द्यावी, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची मंगळवारी (२३ एप्रिल) पाथरी येथे जाहीर सभा झाली. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उमेदवार महादेव जानकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव, डॉ.केदार खटींग, प्रवीण देशमुख, शिवसेनेचे सईद खान आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की; ओबीसी किंवा अन्य घटकांना धक्का न लावता, सरकारने मराठा समाजास दहा टक्के हक्काचे आरक्षण उपलब्ध करुन दिले आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, अशा गप्पा विरोधक आता मारु लागले आहेत. मराठा आरक्षण हे न्यायालयातसुध्दा टिकले पाहिजे याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. आरक्षण देत असतांनाच कुणबीचे दाखलेसुध्दा वितरीत करणे सुरु केले, असे शिंदे म्हणाले. एकीकडे माणसे चंद्रावर जावू लागली असतांना दुसरीकडे स्वतःच्या घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणार्‍या मंडळींना आम्ही जोरदार करंटचा झटका दिला. आता पायाला भिंगरी लावून गावोगाव ते फिरु लागले आहेत. त्यांच्या गळ्याचे आणि कंबरेचे पट्टेसुध्दा निघाले आहेत, असा टोलाही शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.
केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारनेसुध्दा अनेक योजनांना गती दिली आहे. परभणी मतदारसंघातसुध्दा तीन हजार कोटींची कामे सुरु आहेत. या कामांमध्येसुध्दा स्थानिक खासदारांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, असे नमूद करून जालना-नांदेड समृध्दी महामार्ग, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यातून जाणार आहे. परभणी महानगराच्या भूमिगत गटार योजना, महानगरांतर्गत रस्ते यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून, आचारसंहितेनंतर सर्व कामे युध्द पातळीवर सुरु होणार आहेत. सेलू तालुक्यातील पावडे हदगाव शिवारातील २४२ हेक्टर जमीनीवर एमआयडीसीचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. प्रगती आणि रोजगार निर्मितीचे मार्ग डबल इंजिन सरकारने खूले केले आहेत, असे नमूद करीत विरोधकांच्या लंकेचे दहन करून जानकरांना विजयी करण्याचे आवाहनही केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!