हजयात्रेकरूंचे मार्गदर्शन शिबिर सेलूमध्ये उत्साहात
परभणी : सेलू् येथील माशाल्लाह हॉलमध्ये २०२४ च्या हजयात्रेकरूंसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांना यात्रेदरम्यान, काय काय करावे लागणार आहे. काय अत्यावश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी हाजी मौलाना तज्जूमल कास्मी तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना सादेख नदवी, मौलाना खाजा यांची उपस्थिती होती शिबिरामध्ये हजयात्रा कशी करावी व यात्रेची तयारी, या विषयावर हाजी मौलाना तज्जूमल कासमी, मौलाना सादेक सहाब नदवी, मौलाना खाजा, मौलाना जाफर यांनी मार्गदर्शन केले. सत्तार बागवान, रफिक बागवान, खुदारहीम पाटोदकर, सय्यद रियाजद्दीन, सय्यद जफर, मोहमद अर्षद बागवान, मोहंमद जलील, सलीम बागवान, जावेद बागवान, सुलेमानखान पठाण, मोहमद शहिद, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी हाजी जाफर, शमशोददिन काजी, निसार पठाण, हाजी कलीम, सईद घोरी, शेख अकबर यांनी परिश्रम घेतले.