सहकुटुंब पुस्तक वाचन उपक्रमातील उत्कृष्ट वाचकांचा गौरव 

सहकुटुंब पुस्तक वाचन उपक्रमातील उत्कृष्ट वाचकांचा गौरव 

अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचा उपक्रम

परभणी : अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने वाचनाचा संस्कार कुटुंबातच बालकावर घडावा. कुटुंब हीच वाचन संस्काराची शाळा व्हावी म्हणून सहकुटुंब पुस्तक वाचन उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कुटुंबातील जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी होऊन दररोज किमान दहा पाने वाचू व त्याचा सार पाच वाक्यात लिहू अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली होती. जास्तीत जास्त पुस्तके वाचून ज्यांनी नोंदी केल्या आहेत. अशा उत्कृष्ट सहकुटुंब वाचकाचा सन्मान सोहळा जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथे शिक्षण अधिकारी योजना संजय ससाने, प्रसिद्ध कथाकार राजेंद्र गहाळ, कवी हनुमंत देशमुख पुणे, आदर्श शिक्षिका सुप्रिया श्रीमाळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सहकुटुंब पुस्तक वाचन उपक्रमात ९७ कुटुंबांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील उत्कृष्ट वाचकांचा सन्मान सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन केला. तसेच शिक्षकांनी अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करावे. आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा. यासाठी साने गुरुजी उत्कृष्ट शिक्षक वाचक उपक्रमाचेही आयोजन केले होते. राज्यभरातील अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदविला. त्यातील निवडक उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव केला. पोरजवळा, चांदज, साडेगाव, सावंगी म्हळसा, पिंगळी येथील शेतकरी, शेतमजुरी करणाऱ्यासह कुटुंबाने या पुस्तकाच्या स्पर्धेत भाग घेतला. यांना प्रेरित करणाऱ्या रत्नमाला शेळके, वैशाली धाबे, भारत शहाणे, दिपाली महिंद्रकर, सुषमा नवले यांचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री इंदुमती कदम तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले. आभार रविकांत झटे यांनी मानले. यावेळी गिरीजा सोनावळे, हनुमंत देशमुख, सुरेखा टेके श्रीदेवी तेरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रकाश डुबे, कैलास सुरवसे, रविकांत झटे, अनंता कदम, नरहरी मुटकुळे, मारुती डोईफोडे, संतोष रत्नपारखे, सारिका गिरी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!