मराठवाडा विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग
कै.रमेश पारे यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी, परभणी : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने व परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने कै.रमेश पारे यांच्या स्मरणार्थ मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धा एक मेरोजी श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडली. १५० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना यतीन टिपणीस म्हणाले कै.रमेश पारे हे कुशल नेतृत्व, संघटक होते. त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात टेबल टेनिस खेळांचा प्रसार व प्रचार केला. आज जो टेबल टेनिस खेळ पाहतोय तो केवळ रमेश पारे यांच्यामुळे परभणी जिल्ह्यातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे होत्या. नावंदे यांनी सांगितले की; जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धा नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरतात.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस यतीन टिपणीस प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, महेश कांकरिया, चेतन डेकाटे, जिल्हा सचिव गणेश माळवे, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, येथील १५० खेळाडूंचा सहभाग होता. प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन सृष्टी रावणगांवकर यांनी केले. चेतन मुक्तावार यांनी आभार मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच प्रमुख गौरव फन्साळकर, डॉ.अजिंक्य धन, श्रीकांत दुधारे, निखिल झुटे, विजय अवचार, रोहित जोशी, धीरज देशमुख, नृसिंह चाटे, सुरज भुजबळ, स्वप्निल आरसुळ आदींनी परिश्रम घेतले.