Sports : विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत परभणीचे वर्चस्व
नृसिंह चाटे, साक्षी देवकते, आद्या बाहेती, ओवी बाहेती, स्मित करेवार, अद्वैत, आरुषी पांचाळ विजेते
परभणी : (कै) रमेश पारे स्मरणार्थ मराठवाडा मानांकन विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. विविध गटात नृसिंह चाटे, साक्षी देवकते, आद्या बाहेती, ओवी बाहेती, स्मित करेवार, अद्वैत, आरुषी पांचाळ विजेते ठरले आहेत.
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित दोन दिवसीय स्पर्धेतील अंतिम लढती गुरुवारी झाल्या. विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी राज्य सरचिटणीस यतीन टिपणीस, जिल्हा सचिव गणेश माळवे, प्राध्यापक मदनसिंग ठाकुर, डॉ.महेश बाहेती, डॉ.श्रीकांत मणियार, राहुल पारे, गौस पठाण आदींची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पंच प्रमुख गौरव फन्साळकर, रोहित जोशी, चेतन मुक्तावार,डॉ.अजिंक्य धन, श्रीकांत दुधारे, निखिल झुटे, विजय अवचार, धीरज देशमुख, सूरज भुजबळ, स्वप्निल आरसुळ आदींनी परिश्रम घेतले.
गटनिहाय विजयी, उपविजयी खेळाडूंची नावे अशी : ११ वर्ष मुले : अद्वैत मणियार, नीरज नांदेडे, ११ वर्ष मुली : आरुषी पांचाळ (लातूर), श्राव्या पवार, १३ वर्ष मुली : आद्या बाहेती, शरयू टेकाळे, १३ वर्ष मुले : गौरांग वैजवाडे, रुद्र टाक, १५ वर्ष मुले : युवराज सवणे, गौरांग वैजवाडे, १५ वर्ष मुली : शरयू टेकाळे, अनुष्का कोठारी (बीड), १७ वर्ष मुले : स्मित करेवार, युवराज सवणे, १७ वर्ष मुली : ओवी बाहेती, अनुष्का कोठारी, १९ वर्ष मुले : स्मित कारेवार, राजवर्धन शिनगारे (बीड), १९ वर्ष मुली : ओवी बाहेती, अनुष्का कोठारी, महिला गट : साक्षी देवकते, आद्या बाहेती, पुरुष गट – नृसिंह चाटे, अनुज कवठेकर