सेलूतील यासेर उर्दू शाळेच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन; विविध सुविधांसाठी दोन कोटींचा खर्च
सेलू : येथील गुलमोहर कॉलनी परिसरातील तुकाराम नगर येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चून अद्ययावत सोयीसुविधांसह उभारण्यात येत असलेल्या यासेर उर्दू शाळेच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी (तीन मे) उत्साहात झाले.
याप्रसंगी मौलाना सादेक नदवी, मौलाना खाजा साहब, संस्थापक अध्यक्ष रहीमखाँ पठाण, मौलाना वहाब नदवी साहब, हाफेज शफी साहब, जुनेद साहब, अब्दुल्ला साहब, मुफ्ती मारुफ साहब, कबीर साहब, हाफेज नौमान, हाफेज काशिफ, हाजी युनूस कुरेशी, रशीद खान इंजिनिअर, शफिक अली खान साहब, निसार पठाण, कौसर भाई, हाजी महेमूद कुरेशी, इस्माईल भाई, हकीम खादरी, जमाखान साहब, यासेर आर्किटेक, जबीउल्लाह खान साहब, खिजर , जावेद , अस्लम , अमन , इमरान खान वसीमखान, जाफर हुसेन, अलीम खान, आसिम खान, मजीद भाई बागवान, मुफीज भाई आदींची उपस्थिती होती. या वेळी अध्यक्ष रहीमखाँ पठाण यांनी शाळेच्या बांधकाम व सोयीसुविधांची माहिती दिली. शाळेची तीन मजल्यांची आरसीसी इमारत बांधण्यात येणार आहे. अंदाजे खर्च एकूण दोन कोटी रुपये आहे. एकूण सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीमध्ये एकूण १८ वर्ग खोल्या, कार्यालय, संगणक कक्ष खोल्या, प्रयोगशाळा, इंटरनेटद्वारे क्लास अटेंडिंग रूम, अत्याधुनिक उपकरणद्वारे शिक्षणाच्या सुविधा, ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली, स्टोअरसाठी स्वतंत्र खोली, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, मुला-मुलींसाठी स्वच्छता गृहे आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे रहीमखाँ पठाण यांनी सांगितले.
Mashallah