भारतरत्न सहकारिता सन्मान – २०२४ : सेलूतील साईबाबा बँकेला सर्वोत्कृष्ट संचालकासह दोन पुरस्कार

भारतरत्न सहकारिता सन्मान – २०२४ : सेलूतील साईबाबा बँकेला सर्वोत्कृष्ट संचालकासह दोन पुरस्कार

सेलू जि.परभणी : येथील साईबाबा नागरी सहकारी बँकला भारतरत्न सहकारिता सन्मान -२०२४ अंतर्गत ‘बेस्ट डायरेक्टर ऑफ द ईअर’ आणि ‘बेस्ट डिजीटल पेमेंट इनिशेटिव्ह’, असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. अध्यक्ष हेमंतराव आडळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी ही माहिती दिली. भारत को ऑपरेटिव्ह बँक मुंबई या संस्थेच्या वतीने साईबाबा बँकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. २२ मे रोजी मुंबई येथील हाॅटेल ललित येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, असे श्री लाडाणे म्हणाले. दरम्यान, पुरस्काराबद्दल अध्यक्ष हेमंतराव आडळकर आणि साईबाबा बँक संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!