देशासाठी एकमय एकरूप होण्याची गरज : शंभूभाऊ बांदेकर; आंतरभारती ट्रस्टची राष्ट्रीय बैठक उत्साहात 

देशासाठी एकमय एकरूप होण्याची गरज : शंभूभाऊ बांदेकर; आंतरभारती ट्रस्टची राष्ट्रीय बैठक उत्साहात 

*S A K A S H N E W S* 🔻🔻🔻🔻🔻🔻 https://chat.whatsapp.com/LJxMVtWee746mMqv350A1e

रायबंदर (गोवा) : देशातील सद्यस्थिती भयावह असून, भारतीय म्हणून आम्हाला कायम सजग राहावे लागणार आहे. देशात एकात्मता निर्माण होण्यासाठी एकमय होऊन एकरूप होण्याची गरज आहे, असे मत गोवा विधानसभेचे माजी उपसभापती तथा प्रसिद्ध साहित्यिक शंभुभाऊ बांदेकर यांनी शुक्रवारी (१० मे) व्यक्त केले.
पुणे येथील आंतरभारती ट्रस्टच्या वतीने रायबंदर (गोवा) येथील बालभारती विद्यामंदिरमध्ये आंतरभारती दिन, वार्षिक राष्ट्रीय बैठक व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.बांदेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी होते. याप्रसंगी कार्याध्यक्ष अमर हबीब, उपाध्यक्षा संगीता देशमुख, सचिव डी.एस.कोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वच घेतात पण राज्य करतांना त्यांची आठवण होत नाही अशी खंत श्री.बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केली. आंतरभारती ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सानेगुरुजींनी दाखविलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत असून संस्थेची राष्ट्रीय बैठक दरवर्षी वेगळ्या राज्यात आयोजित केली जाते. यानिमित्ताने तेथील लोकांचे जीवन, त्यांची संस्कृती, आचार-विचार जाणून घेऊन बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यापुढेही आंतरभारतीचे काम एक चळवळ म्हणून सशक्त उभे राहिली पाहिजे, यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे, असे अमर हबीब यांनी सांगितले. नाडकर्णी यांनी अध्यक्षीय भाषण केले.‌ यावेळी राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील विजेत्या भावना सिंग यांचा सन्मान करण्यात आला. विशेष उपक्रमाबद्दल अंजली कुलकर्णी, राम माने (पुणे) यांचा सत्कार करण्यात आला. संगीता देशमुख, मनीषा राणी आर्य यांनी राष्ट्रीयस्तरावरील, तर सुभाष लिंगायत, सविता कुरुंदवाडे, एन.सुहास, संजय जिंतूरकर, आदींसह विविध ठिकाणच्या पदाधिकार्‍यांनी आंतरभारतीच्या स्थानिक शाखांमधून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरूवात ” खरा तो एकची धर्म ” प्रार्थनेने झाली. सूत्रसंचालन डी.एस.कोरे यांनी केले. मनीषा राणी आर्य यांनी आभार मानले. विनया धूपकर, आपोलोनीया फर्नांडिस, मधुश्री आर्य, कल्पना नाडकर्णी, संजय माचेवार, सूरज नाईक, एन.सुहास, शिवाजी सूर्यवंशी, एन.डी.पाटील, शिवलिंग मठपती, अनिकेत दिघोलकर, सुधाकर गौरखेडे, प्रभातकुमार पवित्रकार आदींसह पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!