वाढदिवसानिमित्त पाथरीतील वृद्धाश्रमात अन्नदान; श्रीराम जन्मोत्सव समितीचा उपक्रम

वाढदिवसानिमित्त पाथरीतील वृद्धाश्रमात अन्नदान; श्रीराम जन्मोत्सव समितीचा उपक्रम

सेलू : सेलू येथील श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे गुरुवारी, ९ मे रोजी समितीचे नागेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात गुरुवारी अन्नदान व मिठाई वाटप करण्यात आले. शहरातील श्रीराम जन्मोत्सव समितीचा विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नेहमीच पुढाकार राहतो. समितीचे नागेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात गुरुवारी अन्नदान व मिठाई वाटप केले. यावेळी नागेश ठाकूर, इंद्रजित ठाकूर, आदित्य कुलथे, पवन ठाकूर, कृष्णा केशरखाने, बबलू ठाकूर, रोहित धुमाळ, विश्वजित ठाकूर आदींनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!