बालरंगोत्सव : बालनाट्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात; बालकांनी केली धमाल

बालरंगोत्सव : बालनाट्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात; बालकांनी केली धमाल

यश चॅरिटेबल ट्रस्ट, बालरंगभूमी व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा उपक्रम

परभणी : यश चॅरिटेबल ट्रस्ट परभणी, बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा परभणी व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीद्वारे आयोजित बालरंगोत्सव बालनाट्य शिबीर दिनांक 6 ते 10 मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते. याची गरज विद्यार्थ्यांनी धमाल केली. विविध प्रकारची नाट्य सादरीकरणही करून दाखवले.

या शिबिराचे उद्घाटन परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले. या शिबिरात मुलांच्या क्षमता विकसन व व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक दिग्गज कलावंतांनी हजेरी लावून मार्गदर्शन केले.

या शिबिरात पुण्याहून ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.देवदत्त पाठक यांनी मुलांच्या क्षमता विकासांना संदर्भात निरीक्षण क्षमता, भावभावना, नवरसाची निर्मिती रंगमंचीय खेळातून जाणीव करून दिली. डॉ.अर्चना चिक्षे यांनी उच्चार शास्त्र, शब्द फेक, बोलण्याची शैली यांचा सराव करून घेतला. सिनेतंत्रज्ञ, लेखक तथा दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी रंगमंचावरील अभिनय व कॅमेर्‍यासमोरील अभिनय कशा पद्धतीने करावा लागतो हे प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगितले. शिबिराच्या शेवटी नाट्यकलावंत किशोर पुराणिक यांनी अभिनयामधील भाव-भावनानुसार अभिनयातील वैविध्य विद्यार्थ्यांना शिकवले. डॉ . सिद्धार्थ मस्के यांनी एखादे नाट्य सादर करताना होणार्‍या चुकांची जाणीव करून दिली व महाराष्ट्राच्या विविध लोकनृत्य विषयी प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.

या पाच दिवशीय शिबिरात विद्यार्थ्यांनी भरपूर धम्माल करून छोट्या-छोट्या नाट्यछटा सादर केल्या. समारोपीय कार्यक्रमात किशोर पुराणिक, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ ,मधुकर उमरीकर, त्र्यंबक वडसकर, सुधीर सोनुनकर, प्रकाश बारबींड हे सहभागी झाले व या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे या वितरण करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिद्धार्थ मस्के, त्र्यंबक वडसकर, सुधीर सोनुनकर, मारुती वाघमारे, देविदास शिंपले, दत्ता बनसोडे, प्रकाश पंडित, सुप्रिया श्रीमाळी, छाया गायकवाड, सपना वैष्णव आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!