CBSE Board Result : सेलूच्या रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलने राखली उज्ज्वल यशाची परंपरा

CBSE Board Result : सेलूच्या रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलने राखली उज्ज्वल यशाची परंपरा

सेलू : सीबीएसई बोर्ड दिल्लीद्वारा घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. यावर्षीही सेलू येथील एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलने निकालाची सर्वोत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे.‌ शाळेतून ऋग्वेद कीर्तने ९७.२ टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय वरद कदम ९६.८ टक्के, तर ९६ टक्के गुण मिळवून इशिका पवारने तृतीय क्रमांक पटकावला आहे.‌ वरद सारडा ९५.६ , प्रथमेश लाहोटी ९५.४, रामप्रसाद काळे ९४.६, तेजस मोगल ९४.२, पूनम पारपीयानी ९३.८, लक्ष्मीकांत कुलकर्णी ९३.६, तनिष्क ढालकरी ९३, रोहित ढगे ९३, सुमित संगेवार ९२ आदिती आवटे ९२, स्नेहा घुमरे ९१.८, गौरी रोकडे ९१.२, तनय मोगल ९१, अपूर्वा मोगल ९०.४ टक्के यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ९० टक्क्यांवर एकूण १६, ८० टक्क्यांवर १६ विद्यार्थी, ७० टक्क्यांवर ८, तर ६० टक्क्यांवर गुण ८ विद्यार्थ्यांनी घेतले आहेत.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, बाजीराव मोगल, रीना ठाकूर आदींसह शिक्षक, कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!