राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हजयात्रेकरूंचा सत्कार; सेलूत माजी आमदार विजय भांबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हजयात्रेकरूंचा सत्कार; सेलूत माजी आमदार विजय भांबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

सेलू जि.परभणी : राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाच्या वतीने २०२४ च्या हजयात्रेसाठी निघालेल्या भाविकांचा १९ मे रोजी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे, मदिना मस्जिदचे इमाम शेख रईस खासमी, मौलाना मोहंमद सादेक, माजी जिप सभापती अशोकनाना काकडे, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, सुधाकर रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी शेख अब्दुल सत्तार, शेख रफिक, शेख बिबन, सय्यद झफर, सय्यद रियाझुद्दिन, शेख सत्तार ताबोळी, शेख जलील, मोहंमद अरशद, मोहंमद शाहिद, सुलेमान खान, खुदारहीम पठाण पाटोदकर, शेख सलीम बागवान या यात्रेकरू भाविकांचा वस्त्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ हाजी यांंचा सन्मान करण्यात आला. शेख कौसर, नईम बागवान, कलीम बेलदार, रघुनाथ बागल, गौतम साळवे, पप्पू गाडेकर, ॲड.रोडगे, विशाल देशमुख आदींची उपस्थिती होती. माजी नगरसेवक अब्दुल मजीद बागवान, शेख समीर, गौस लाला, सय्यद नियाझ, शेख दिलावर, रफिकभाई, लालू कुरेशी, इफ्तेखार सिद्दीकी आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन परवेज सौदागर यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!