HSSC RESULTS : सेलूच्या नूतन महाविद्यालयाचा निकाल ९२.४२ टक्के

HSSC RESULTS : सेलूच्या नूतन महाविद्यालयाचा निकाल ९२.४२ टक्के

सेलू जि.परभणी : इयत्ता बारावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन महाविद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विविध शाखांचा एकूण निकाल ९२.४२ टक्के आहे. प्राचार्य डॉ.उत्तम राठोड यांनी ही माहिती दिली. विविध शाखांचे एकूण ६०९ पैकी ६०७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ५६१ उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रावीण्य श्रेणीत ५८, प्रथम १७०, द्वितीय २५७, तर पास श्रेणीत ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८२.९९, विज्ञान ९७.१५, वाणिज्य ९५.३९ , एचएसव्हीसी ( व्होकेशनल) ८४.३७ टक्के आहे. कला शाखा – प्रथम अक्षय अंभुरे ८५.३३ टक्के, व्दितीय नंदिनी शिंदे ८३.८३, तृतीय शितल खुळे ८३.३३ टक्के, विज्ञान शाखा – प्रथम अभिषेक शिंदे ८७ टक्के, द्वितीय श्रद्धा थळपती ८४.६७ टक्के, तृतीय कपिल जोशी ८२.१७ टक्के, वाणिज्य शाखा – प्रथम युवराज बादाड ९३ टक्के, द्वितीय संदेश राऊत ९१.८३ टक्के, तृतीय किरण जावळे ९१.१७ टक्के, एचएसव्हीसी ( व्होकेशनल) – प्रथम – सचिता जैस्वाल ७१.८३ टक्के, व्दितीय वैष्णवी बरसाले ७१.७१ टक्के, तृतीय अभिषेक नीलवर्ण ६८ टक्के गुण प्राप्त केले आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!