HSSC RESULTS : सेलूतील नूतन कन्याचा निकाल ९२.८५ टक्के
सेलू : येथील श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाने बारावीच्या कला व वाणिज्य शाखेच्या निकालात निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे. एकूण निकाल ९२.८५ टक्के आहे. कला शाखेचा निकाल ९४.११ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९१. ६६ टक्के आहे. दहा विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.
कला शाखा- प्रथम स्वाती उगले ८६ टक्के, प्रतीक्षा जाधव ७८.८३ तृतीय मनीषा खरात ८३.५०, वाणिज्य शाखा- प्रथम वैष्णवी वहाडे ८४.८३ द्वितीय प्रतीक्षा जाधव ८०.५०, तृतीय सय्यद सानिया बिबन ८०.१७ टक्के. यशस्वी विद्यार्थिनींचे नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्या उज्वला लड्डा, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल. सपना पाटणी, अनंता बोराडे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे