SSC Results 2024 : सेलू तालुक्याचा निकाल ९०.७३ टक्के, सहा शाळांचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेचा छत्रपती संभाजीनगर विभागाचा ऑनलाईन निकाल सोमवारी, २७ मे रोजी जाहीर झाला. सेलू तालुक्यातून विविध शाळांचे एकूण २३४४ पैकी २३१० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २०९६ (९०.७३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रावीण्य श्रेणीत ६१७, प्रथम श्रेणीत ६५८, द्वितीय ५९६, पास श्रेणीत २२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
♦’या’ शाळांचे सर्वाधिक प्रावीण्य प्राप्त
दहावीच्या परीक्षेसाठी सेलू तालुक्यातील नूतन विद्यालयाचे सर्वाधिक ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४१९ ( ८७.६५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रावीण्य श्रेणीत सर्वाधिक १४८, प्रथम १०७, व्दितीय ११०, पास श्रेणीत ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नूतन कन्या प्रशालेच्या ३२८ पैकी ३०० (९१.४६ टक्के) विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. प्राविण्य १०७, प्रथम ८८, द्वितीय ८१, पास श्रेणीत २४ उत्तीर्ण झाल्या आहेत.
♦’या’ शाळांचा निकाल शंभर टक्के
खान अब्दुल गफार खान उर्दू हायस्कूल, सेलू (२२ पैकी २२ उत्तीर्ण), न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, सेलू (३७ पैकी ३७ ), कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सेलू (१९ पैकी १९), ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, सेलू (७७ पैकी ७७ ), नूतन इंग्लिश स्कूल, सेलू (२५पैकी २५), व्हिजन इंग्लिश स्कूल, सेलू (३७ पैकी ३७)
♦अन्य शाळांचा निकाल याप्रमाणे : न्यू हायस्कूल ७८.२६ टक्के, डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल ८३.७२, शारदा विद्यालय ८५.७१, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय ७०.५८, जिल्हा परिषद प्रशाला वालूर ९३.५४, जिल्हा परिषद प्रशाला देऊळगाव गात ९३.७५, जिल्हा परिषद प्रशाला गुगळी धामणगाव ७५.८६, ज्ञानोपासक विद्यालय, कुपटा ९३.००, नेताजी सुभाष विद्यालय चिकलठाणा बुद्रुक ९३.९३, श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय देवगाव फाटा ९९.१२, नेताजी सुभाष विद्यालय खवणे पिंपरी ९१.८३, नितिन माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव ८०.९५, क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय, डिग्रस जहांगीर ८७.५०, पांडुरंग विद्यालय मोरेगाव ९८.०३, श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक आश्रमशाळा वालूर ९३.९८, कै.सुमनताई केंद्रीय आश्रमशाळा निवासी, सेलू ३३.३३, ज्ञानोदय माध्यमिक विद्यालय, शिंदे टाकळी ८४.००, वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय वालूर ८६.७९, यशवंत विद्यालय, सेलू ९५.२७, यासेर उर्दू हायस्कूल सेलू ९६.८२, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा ९४.११, यशवंत विद्यालय, माऊलीनगर, सेलू ९४.२३