SSC Results 2024 : सेलूच्या ज्ञानतीर्थ विद्यालयाची तनिष्का डख परभणी जिल्ह्यातून प्रथम; ४० विद्यार्थ्यांनी मिळविले विशेष प्राविण्य
शंभर टक्के निकालाची परंपरा कायम, मान्यवरांकडून कौतुक
सेलू : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानातीर्थ माध्यमिक विद्यालयाच्या तनिष्का डख हीने ९९.८० टक्के गुण घेऊन परभणी जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे व प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे यांनी ही माहिती दिली.
प्रावीण्य श्रेणीत ऋतुजा आघाव ९८.००, जान्हवी रोडगे ९७.२०, श्रुती बोराडे ९६.२०, पल्लवी तौर ९५.४० विशाखा जाधव ९५.००, श्वेता जाधव ९४.८६ , वैजनाथ हारकळ ९४.०८, सावता ढवळे ९१.०० संध्या शिलार ८८.६०, श्रावणी सोळंके ८८.६०, समृद्धी खंदारे ८८.४०, स्नेहल आघाव ८८.४० दर्शना कव्हळे ८७.४०, प्रदूम्न चट्टे ८७.६०, श्रुती निर्मळ ८७.८०, मानसी कव्हळे ८६.८०, पृथ्वीराज चव्हाण ८४.६०, प्रज्वल डख ८४.४०, वेदिका कदम ८४.४०, धनश्री ठोके ८४.००, सागर सोनवणे ८३.२०, दिव्या निकम ८२.२०, ऋतुराज गोटमुकले, ८१.६०, आकाश मावई ८१.४०, मानसी मांडे ८१.४८, वेदिका डक ८१.००, समृद्धी सोळंके ८०.६०, श्रद्धा सावते ८०.००, ऋतुजा कवडे ८०.०० अशाएकूण ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर प्रथम श्रेणीत २७, द्वितीय श्रेणीत पाच , तर पास श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, मुख्याध्यापक हरिभाऊ कोबळे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे तसेच धम्मपाल ठोके, संदिप बाकात, रतन होंडे, शशिकांत बिहाडे, विठ्ठल सरकटे आदींनी कौतुक केले आहे.