SSC Results 2024 : सेलूतील नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश; १०७ विद्यार्थिनी प्रावीण्यप्राप्त
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेने दहावीच्या परिक्षेत यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेचा एकूण निकाल ९१.४६ टक्के आहे. ही माहिती मुख्याध्यापिका उज्ज्वला लड्डा यांनी दिली. १०७ विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे. प्रथम श्रेणी ८८, द्वितीय श्रेणी ८१, तर पास श्रेणीमध्ये २४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. शाळेतून प्रथम ऋतुजा रामप्रसाद रोडगे (९७.४०), द्वितीय समृध्दी कैलास भुते (९७.२०), तर गायत्री मधुकरराव कुलकर्णी (९६.६०) , श्रेया भगीरथ सोळंके (९६.६०) या दोघांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष श्री.डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डाॅ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, संस्थेचे सदस्य तसेच मुख्याध्यापिका उज्ज्वला लड्डा, उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे, पर्यवेक्षक आर.एस.मोगल शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.