SSC Results 2024 : सेलूच्या यासेर उर्दू माध्यमिक शाळेचा निकाल ९६.८२ टक्के

SSC Results 2024 : सेलूच्या यासेर उर्दू माध्यमिक शाळेचा निकाल ९६.८२ टक्के

सेलू : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था सेलू संचालित यासेर उर्दू माध्यमिक शाळेने उज्ज्वल यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल ९६.८२ टक्के आहे. पठाण आयेशा उमीज मुबीन खान विद्यार्थिनीने ९२.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय शेख महेक संगीर ८७.४० टक्के, तृतीय आदींना मजदी शकील अहेमद खान ९३.०० टक्के गुणाने यश संपादन केले आहे. प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये शेख रेहान शफी ८१.६०, पठाण अरीना फातेमा मुबीन खान ८०.८०, पठाण मुस्तफा गुलाम अली खान ८०.२०, शेख हुरैन शफी ७९.००, मोटलिया मिसबाह इरफान ७६.६० यांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीत १८, द्वितीय श्रेणीत २३ व १२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. न एकूण ६३ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले होते. ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दोन विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. उर्दू माध्यमातून प्रथमतःच सर्वाधिक ६३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट करणारी यासेर उर्दू शाळा ही एकमेव शाळा ठरली आहे, असे संस्थाध्यक्ष रहीमखाँ पठाण यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष रहीम खान, मुख्याध्यापक टी.एस.कास्मी, शिक्षक सय्यद खिजर अहेमद, फझल सिद्दीकी, फहेमीदा, जहीर अन्सारी, खान कौसर बेगम, शेख अस्लम, गडदे, राऊत, वानखेडे, गट शिक्षणाधिकारी राऊत,भुजंग थोरे सर, अजमत खान, वसीम खान, इमरान खान आदींसह विविध स्तरांतून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!