SSC Results 2024 : नूतन विद्यालयाचे १४८ विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त; निकाल ८७.६५ टक्के 

SSC Results 2024 : नूतन विद्यालयाचे १४८ विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त; निकाल ८७.६५ 

सेलू : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा नूतन विद्यालय सेलूचा निकाल ८७.६५ असून तब्बल १४८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, पर्यवेक्षक के.के.देशपांडे यांनी ही माहिती दिली.

प्रथम श्रेणीत १०७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ११०, तर उत्तीर्ण श्रेणी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४८० पैकी ४७८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यापैकी ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणाानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी याप्रमाणे : प्रथम सारंग सुनील कुलकर्णी ९९.०० टक्के, द्वितीय संस्कृती उद्धव जाधव ९८.४०, अथर्व महेश दिग्रसकर ९६.६० टक्के. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष श्री.डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डाॅ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री नंदकिशोरजी बाहेती, संस्थेचे सदस्य तसेच मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!