SSC Results 2024 : बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश शाळेचा निकाल शंभर टक्के, पलक बिहाणी सर्वप्रथम
सेलू : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत घेण्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के आहे. मुख्याध्यापक एन.पी.पाटील यांनी ही माहिती दिली. शाळेनी यशाची परंपरा कायम राखली आहे. पलक अविनाश बिहाणी या विद्यार्थिनीने ९६.४० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय रिद्धी राजेश पद्मावत ९३.६०, तृतीय रसिका रुपेश जाजू ९१.६० टक्के आहे. ऋतुजा पद्मावत ८९.८०, विनीत पद्मावत ८९.४०, वेदश्री जोशी ८९.२०, श्रीनिवास आष्टीकर ८८.००, सांची गायकवाड ८८.००, आदित्य कदम ८५.६०, रिया चव्हाण ८४.००, आदित्य गाडेकर ८३.००, प्रज्वल पारवे ८२.४०, सार्थक कुलकर्णी ८२.००, प्रशिक सोनवणे ८१.४०, ऋतुजा चव्हाण ८०.२० टक्के या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया, सचिव डॉ व्ही.के.कोठेकर , सहसचिव श्री.जयप्रकाशजी बिहाणी , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाशचंद बिनायके, डॉ.विजेंद्रजी नागोरी, नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापक एन.पी.पाटील, भुजंग देऊळगावकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.