परभणी लोकसभा : खासदार जाधवांचा निवडणूक प्रमाणपत्र देऊन गौरव

परभणी लोकसभा : खासदार जाधवांचा निवडणूक प्रमाणपत्र देऊन गौरव

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

परभणी : १७-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रीकी महाविद्यालय येथे पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. १७ परभणी लोकसभा मतदारसंघातून शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जाधव संजय (बंडू) हरिभाऊ यांना ६,०१,३४३ मते मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जानकर महादेव जगन्नाथ यांना ४,६७,२८२ इतकी मते मिळाली. यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जाधव संजय (बंडू) हरिभाऊ हे १,३४,०६१ मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी घोषीत केले श्री गावडे यांच्या हस्ते जाधव संजय (बंडू) हरिभाऊ यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी निवडणूक निरिक्षक कृष्णकुमार निराला आणि एन. मोईनोद्दीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, आमदार राहूल पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती.
१७- परभणी लोकसभा मतदारसंघातून एकूण ३४ उमेदवार निवडणुकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते प्राप्त झाली.
संजय (बंडू)जाधव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – ६,०१,३४३ मते (विजयी)  मताधिक्य – १,३४,०६१
महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष  – ४,६७,२८२ मते, पंजाब डख, वंचित बहुजन आघाडी- ९५,९६७ मते, अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते अशी : आलमगीर मोहम्मद खान (बहुजन समाज पार्टी )-११,०६२, कैलास पवार (बळीराजा पार्टी)-९,५२०, डॉ.गोवर्धन खंडागळे (बहुजन भारत पार्टी)- १५,३९५, दशरथ राठोड (महाराष्ट्र विकास आघाडी)-४,३९४, राजन क्षीरसागर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)-६,६४९, विनोद अंभुरे (बहुजन मुक्ती पार्टी)-२,०४१, श्रीराम जाधव (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी)-३,६२८, शेख सलिम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत)-२,६१९, सयद इरशाद अली (सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया)-४,६४४, संगीता गिरी (स्वराज्य शक्ती सेना).-२,३३९, अपक्ष उमेदवार : अनिल मुदगलकर-३,५३३, अर्जुन भिसे-६,९२३, आप्पासाहेब कदम-३,८९१, कारभारी मिठे-४,२७६, कांबळे शिवाजी-११,०६०, किशोर ढगे-५,४८०, किशोरकुमार शिंदे-६,५४८, कृष्णा पवार-१०,१५४, गणपत भिसे-३,६०४, गोविंद देशमुख-३,४५९,बोबडे सखाराम-१,२४६, मुस्तफा मैनोदिन शेख-१,३०२, राजाभाऊ काकडे-३,३०२, राजेंद्र अटकळ-२,८१२, विजय ठोंबरे-१,९५९, विलास तांगडे-८,८२०, विष्णुदास भोसले-१,८६०, समीर दुधगावकर-११,०५६, सय्यद अब्दुल सत्तार-२,६५०, सुभाष जावळे-३,४३४, ज्ञानेश्वर दहिभाते-३,५३९, एकूण मतदान – १३,२७,७९१, नोटा-३,३८५, अवैध मते-१५८, टेंडर मते- ३

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!