सेलूतील विद्यार्थ्यांचे ‘नीट’परीक्षेत घवघवीत यश 

सेलूतील विद्यार्थ्यांचे ‘नीट’परीक्षेत घवघवीत यश 

सेलू जि.परभणी : वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सेलू येथील पार्थ दत्तराव रोकडे याने ६९०, अथर्व सुरेश लहाने ६७५, गौरी हनुमंत कदम ६४८, तर सूरज संजय लहाने ६२९ गुण प्राप्त केले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील निकीता देशमुख, सानिया अमरीन खान, गायत्री रणेर, मोहम्मद जवाद शाकेर उल, सईद बुशरा साहीर, शेख जुनेद अहमद अखिल, शेख दिया अफरोज, मोहम्मद याहीया कामरान, मोहम्मद जैद फारुखी, अजय पतंगे, प्रेम लांडगे, श्रृतिका बल्लाळ, ओमकार राऊत आदी विद्यार्थ्यांनी ६५० हून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!