जिंतूर विधानसभा : विजय भांबळे यांना निवडून आणण्याचा निर्धार; खासदार संजय जाधव यांचा जिंतूरमध्ये नागरी सत्कार
परभणी : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व मतदाराने दिलेली साथ मला मोलाची ठरली आहे. तसेच माजी आमदार विजय भांबळे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भांबळे यांचे एकनिष्ठेने काम करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायचे आहे, असे मत नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी केले.
जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात माजी आमदार विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी खासदार जाधव बोलत होते. खासदार जाधव म्हणाले की; निवडणुकीत जनतेची दिलेली साथ अत्यंत महत्वाची आहे म्हणून मी जनतेपुढे नतमस्तक होत आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याशी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवावा असे आवाहन देखील जाधव यांनी केले.
याप्रसंगी विजय भांबळे म्हणाले की; आम्ही आघाडी धर्म पाळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांचे एकनिष्ठेने काम केले आहे, त्यामुळे मतदारसंघातून १३००० मताधिक्य मिळाले आहे. मतदारसंघातील नागरिक सुजाण असून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे आहेत. त्यामुळे जातीधर्म न मानता सर्व समाजाने एकजीवाने भरघोस मतदान केले आहे.
या वेळी प्रमोदराव भांबळे, विश्वनाथ राठोड, अजयभैया चौधरी, रामराव उबाळे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, मनिषाताई केंद्रे, साबिया बेगम कपिल फारुकी, आशाताई खिल्लारे, कैलास महाराज चारठाणकर, गणेशराव इलग, मनोहर डोईफोडे, दत्तराव काळे, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानिमिया, लखुजी जाधव, शरद अंभूरे, मधुकर भवाळे, सलीम काझी, रामजी शर्मा, अरविंद कटारे, अनंतराव देशमुख, बालाजी नव्हाट, कृष्णा राउत, तोडकर, शौकत लाला, अक्कू लाला, आसेफिद्दिन काझी, गंगाधर तरटे, मनोहर सातपुते, बालाजी सांगळे, नंदकिशोर अंभोरे, अशोक शिंदे, खय्युम कादरी, पंडित जाधव, अशोक प्रधान, बंडूभाऊ लांडगे, शिरकु पाटील, शंकर गंजे, मनोज रोकडे, अभिलाष राऊत, नागेश पुणेकर, परिक्षीत भांबळे, छत्रपती मानवते, झनक जाधव, रामेश्वर मुंढे, हकीम लाला, आसाराम म्हेत्रे, मदन चव्हाण, शैलेश घुगे, अविनाश मस्के, संदीप काळे, नागेश पुणेकर, बबलू कदम, देवा जाधव, हबीब भाई, देविदास राठोड, शाहेद सिद्दिकी, विश्वंभर पवार, मांगीलाल राठोड, सतीश बरडे, घुगे सर, प्रवीण चव्हाण, राहुल कनकुटे, सुधाकर मस्के, साहेबराव चव्हाण, वसंत पाईकराव, राहुल घुले, माणिक सानप, शालिकराम गडदे आदींसह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.