एलआयसी : सेलू शाखा व्यवस्थापकपदी बापूसाहेब ठोंबरे; कोडगीरकर यांची परभणी शाखेत बदली

एलआयसी : सेलू शाखा व्यवस्थापकपदी बापूसाहेब ठोंबरे; कोडगीरकर यांची परभणी शाखेत बदली                                      

सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतील व्यवस्थापक संतोष कोडगीरकर यांची परभणी (LIC CLIA Satellite Office) शाखेत बदली झाली आहे. तर, बापूसाहेब ठोंबरे यांची सेलू शाखा व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे. या बद्दल दोन्ही अधिकार्‍यांचा सेलू शाखेतर्फे स्वागत-सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रभाकर भांडवले होते. प्रमुख अतिथी म्हणून नागेश पुराणिक उपस्थित होते. सेलू शाखेच्या वतीने संतोष कोडगीरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर श्री ठोंबरे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नागेश पुराणिक, योगेश जायभाये, शमशोद्दीन शेख, उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, शिवाजी अघाव, संपत कपाळे, मन्मथ देवढे, बोराडे, डॉ शेळके, दामोधर काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रदिप कानकटे, अजय पुंडलिक, श्रीपती जगताप, भारत कोलते, समीर थोरात, अमर पाटील, भालचंद्र बरडे, शिवशांत काळे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जीवने, अरूण साळवे, संदीप जाधव, रंगनाथ ढोले, बाबा जगदाडे, साहेबराव राठोड, संजय मनियार, प्रदीप झंवर, दत्ता सरकटे, झोल आदींची उपस्थिती होती. योगेश जायभाये यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी, विमा प्रतिनिधी तसेच सेलू तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थीत होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!