सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात

सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात

विविध उपक्रमांसह विद्यार्थ्यांनी घेतला घोडेस्वारीचा आनंद 

सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, उत्कर्ष विद्यालय, प्रॉस्परस पब्लिक स्कूल आणि ज्ञानतीर्थ विद्यालयात शनिवारी,१५ जून रोजी विविध कार्यक्रमांनी प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

विद्याविहार संकुल परिसरात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत केले. दर्शनी भागात कार्टून मिकी माऊस, जोकर आदींनी लक्ष वेधून घेतले. श्रीराम प्रतिष्ठान आऊटस्टडिंग टलेंट (स्पॉट) परीक्षेमध्ये २१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व उत्कर्ष विद्यालयात सवलतीत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवानिमित्त तोडफोड जोड, कबाड से जुगाड, विज्ञानातील गंमती जमती, भाषण स्पर्धा आदी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चारचाकी, दुचाकी वाहने, टीव्ही, संगणक, सीपीयू, प्रिंटर आदींसह व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती प्रदर्शनाद्वारे देण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीने रिसायकल, रियूज, रेड्यूस ( थ्री आर) आदींबाबत महत्व विषद करण्यात आले. कबाड से जुगाड या उपक्रमात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ घरगुती साहित्य तयार केले. चिमुकल्यांनी विज्ञानातील गंमती-जमतीचे प्रयोग सादर करून सर्वांचे लक्ष वेधले‌. माझा शाळेतील पहिला दिवस, माझ्या स्वप्नातील शाळा, मामाचा गाव आदी विषयांवरील भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त विचार मांडले. विजेत्यांना बक्षीसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यानिमित्ताने घोडेस्वारीचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!