…’या’ शाळांचे प्रवेश हाऊसफुल्ल; पहिल्याच दिवशी रांगाच रांगा

…’या’ शाळांचे प्रवेश हाऊसफुल्ल; पहिल्याच दिवशी रांगाच रांगा

पाचशेहून अधिक विद्यार्थी प्रतीक्षेत

इयत्ता पहिलीसह इयत्ता दुसरी ते दहावीत प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मराठी माध्यमात अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. उर्दूमध्ये इयत्ता दुसरी ते दहावीमध्ये २८८ विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत.

प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या नारेगाव शाळेत मराठी, उर्दू माध्यमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही रांगाच रांगा दिसून आल्या. प्रवेशासाठी एवढी गर्दी झाली की, नवीन प्रवेश थांबविण्याची वेळ आली. पहिल्याच दिवशी पाच तुकड्यांचे प्रवेश फुल झाले. मराठीसह उर्दू माध्यमाच्या शाळेत पाच-पाच तुकड्यांचे प्रवेश हाऊसफुल झाले.

वीसपेक्षा अधिक इंग्रजीसह मराठी, उर्दू माध्यमांच्या नामांकीत शाळा असताही शाळेच्या पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या नारेगाव मराठी आणि उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिली मध्ये पाच-पाच तुकड्यांचे प्रवेश फुल झाले आहेत. मराठी माध्यम मध्ये १३९, तर उर्दू माध्यममध्ये १३० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. मराठी, उर्दू माध्यमात इयत्ता पहिलीमध्ये आपल्याला पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी इच्छुक पालकांची संख्या मोठी होती. उपलब्ध सोयीसुविधांचा विचार करता महापालिका मुख्याध्यापकांवर प्रवेश थांबविण्याचे वेळ आली. प्रशासनाने स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये विशेष करून सेमीइंग्रजी माध्यम सुरू करणे, आम्हाला खेळू द्या स्मार्ट गुरु ॲपची निर्मिती सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना, कंटेनर लायब्ररीचा समावेश आहे.


‘आम्ही गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबवितो. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली. – अबरार अहमद, मुख्याध्यापक, उर्दू माध्यम


शाळेतील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे निकाल सतत उंचावत आहे. विद्यार्थी, पालकांचा ओढा कायम आहे. – प्रिया सिंह-ताजवे, मुख्याध्यापिका, मराठी-सेमी माध्यम, नारेगाव


 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!