श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; पपेट शो, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने जिंकली चिमुकल्यांची मने

श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; पपेट शो, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने जिंकली चिमुकल्यांची मने

श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; पपेट शो, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने जिंकली चिमुकल्यांची मने

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मी आणि माझी आई स्पर्धा, शैक्षणिक प्रदर्शन, बोलक्या बाहुल्यांचा खेळ व पपेट शो रविवारी, १६ जून रोजी साई नाट्य मंदिर येथे पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झी मराठी फेम व गेम्स क्वीन चैताली माजगावकर भंडारी, संस्थेचे मार्गदर्शक डॉ रामराव रोडगे, ॲड.दत्ताराव कदम, रामेश्वर राठी, विशाल काला, श्री मालाणी, प्रफुल्ल बिनायके, अर्जुन बोरुळ, गणेश काटकर, माया चंदेल, निशा चंदेल, अस्मिता सूर्यवंशी, संध्या वानरे, सुमेधा जाधव, सोनल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मी आणि माझी आई’ स्पर्धेत सहभागी स्पर्धांना रॅम शो डान्स वन मिनिट टॉक शो बेस्ट बॅटिंग व बेस्ट सेल्फी विथ बेबी आदी टप्प्यातून जावे लागले. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग महिलांनी नोंदविला होता. स्पर्धेत अस्मिता सूर्यवंशी यांनी प्रथम, तर मयुरी अंभोरे यांनी द्वितीय क्रमांक व निशा नाटकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व घटक संस्थेचे शैक्षणिक प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले होते. या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये क्युरिअस किड्स, फिनकिड्स प्री स्कूल, जिज्ञासा बालविहार, प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, प्रॉस्परस पब्लिक स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, अपूर्वा पॉलिटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डॉ. राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालय व आदित्य अध्यापक विद्यालय आदी घटक संस्थेने सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिकवल्या जाणारा अभ्यासक्रम, प्रीस्कूलचे स्वनिर्मित पुस्तके, पद्धतीने शाळेत घेतले जाणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी, उपलब्ध कोर्सेस, शाळेत शिकवली जाणारी पद्धत आदी विषयाची माहिती या प्रदर्शनामधून उपस्थित पालकांना देण्यात आली. शाळा प्रवेशोत्सवानिमीत्त शाळेच्या दुसऱ्या दिवशीही खास विद्यार्थ्यांकरिता बोलक्या बाहुल्यांचा खेळ व पपेट शोच्या माध्यमातून चैताली माजगावकर भंडारी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या नाविन्यपूर्ण बोलक्या बाहुल्या व पपेट शोच्या प्रयोगातून आनंदित केले. या दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी बोलक्या बाहुल्यांचा खेळातून घेतला. आकर्षक पद्धतीने विविध पपेट शोचे प्रयोग व बोलक्या बाहुल्यांचा खेळाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रयोगाचा विद्यार्थी व पालकांनी मनसोक्त आनंद घेतला. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी, तर आभार डिगांबर टाके यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!