आंतरराष्ट्रीय योग दिवस : सेलूमध्ये योग महोत्सव उत्साहात; साईबाबा मंदिरात कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिवस : सेलूमध्ये योग महोत्सव उत्साहात; साईबाबा मंदिरात कार्यक्रम

सेलू, जि.परभणी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेलू येथील पतंजली योग समिती आणि विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने १९ ते २१ जून या कालावधीत योग महोत्सव उत्साहात पार पडला.

श्री साईबाबा मंदिराच्या सभामंडपात सकाळी सहा ते आठ यावेळीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी, २१ जून रोजी योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, पतंजली समितीचे परभणी जिल्हा प्रभारी निखिल वंजारे, चंद्रप्रकाश सांगतानी, पूनम खत्रीआदींची उपस्थिती होती. या वेळी योग शिक्षक वंजारी, मधुरा खारकर, संतोष पाटील, परमेश्वर काकडे, सीमा झोल, ॲड.मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रारंभी पतंजली पूजन व दीपप्रज्वलन झाले. सच्चिदानंद डाखोरे यांनी योग गीत सादर केले. योग महोत्सवात शहरातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. पूनम खत्री यांनी आभार मानले. महोत्सवासाठी ज्ञानोबा बरसाले, डॉ.श्रीराम गजमल, योगश गजमल, एन.एम.देशपांडे, बालासाहेब गजमल, डी.के.माकोडे, कैलास रकटे, परमेश्वर राऊत, सोमेश्वर गिराम व पतंजली योग समिती, महिला समिती, भारत स्वाभिमान, किसान समिती व युवा भारत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!