Agniveer : डिग्रसवाडीचे अग्निवीर मारोती गांजकर यांचे सेलूमध्ये जल्लोषात स्वागत
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी गावचे सुपुत्र मारोती दिगांबर गांजकर याचे सिमला येथे अग्निवीर गोरखा कमांडो गटातून भारतीय सैन्यात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण झाले. रविवारी त्यांचे सेलू स्थानकावर आगमन झाले. यानिमित्ताने गांजकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणूक काढून सेलू व डिग्रसवाडी येथे सत्कार करण्यात आला. या वेळी जयसिंग शेळके, बाळकृष्ण लेवडे, संतोष निर्वळ, पांडुरंग कदम, डिगांबर गांजकर, शुभम जाधव, गोविंद निर्वळ, संभाजी होगे, कृष्णा गांजकर, रामेश्वर गांजकर, रावसाहेब गांजकर, सुहास आठवले, दर्शन आठवले, धुराजी आठवले, भरत शेरे, संतोष होगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.