‘त्या’आरोपीवर कठोर कारवाई करा : सेलू येथील भाजप कार्यकर्त्यांचे प्रशासनाला निवेदन
सेलू : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून, त्यामागील दडलेल्या राजकीय व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने सेलू येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. सोमवारी,२४ जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत दळवे, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, अजय डासाळकर, कपिल फुलारी, ॲड.रामेश्वर शेवाळे, बाळासाहेब काजळे, गणेश काटकर, संदीप बोकन, दिलीप मगर, एकनाथ सारुक, अभय महाजन, राजू सोळंके, महेश नावाडे, खंडेराव घुगे, प्रकाश शेरे, नामदेव झिंबरे, सुदामराव रोकडे, प्रल्हादराव गोरे, वैजेनाथ मुसळे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.