प्रसन्न जीवनासाठी योगासने आवश्यक : भगवान कुलकर्णी; स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयमध्ये कार्यक्रम
सेलू : सर्वांनी व्यायामासाठी रोज दोन तास दिले पाहिजेत. तरच आपण निरोगी राहू. स्वस्थ आणि प्रसन्न जीवनासाठी योगासने ही करायलाच हवीत, असे मत सेवानिवृत्त शिक्षक भगवान कुलकर्णी यांनी सोमवारी, २४ जून रोजी व्यक्त केले.
येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयमध्ये आयोजित जागतिक योग दिन आणि ‘एक दिवस एक पुस्तक उपक्रमांतर्गत स.ना पोकळे लिखित ‘योगसाधना ‘ या पुस्तकावरील चिंतनात्मक मनोगत व्यक्त करतांना श्री.कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी योग अभ्यासक बालासाहेब गजमल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक योगशिक्षक देविदास सोन्नेकर उपस्थित होते.
याप्रसंगी नूतन विद्यालयाच्या सृष्टी सोळंके आणि शौर्य फटाले या विद्यार्थ्यांनी योगासनांची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी देविदास सोन्नेकर यांनी मार्गदर्शन केले. चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. पण या सोबतच सुक्ष्म व्यायामही गरजेचा आहे. नियमित योगासने केल्यास आरोग्यदायी जीवन मिळते. योगसाधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे सोन्नेकर म्हणाले. कार्यक्रमाला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसचिव संजय विटेकर, प्रकाश धामणगावकर, अजित मंडलिक, रमा बाहेती, प्रणिता सोलापुरे, भरदम, रामराव गायकवाड, प्रा.नागेश कान्हेकर, गणेश माळवे, सुरेखा रामदासी, विनायक मोगल, सुष्मिता गाजरे, दत्तात्रय आंधळे, विनायक धामणगावकर, यशवंत चारठाणकर, मधुकर वाकडीकर, रश्मी बाहेती यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक अनंत मोगल यांनी केले. ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी आभार मानले.