आम्रवन महाविहाराचा कायापालट करणार : आमदार मेघना बोर्डीकर यांची ग्वाही

आम्रवन महाविहाराचा कायापालट करणार : आमदार मेघना बोर्डीकर यांची ग्वाही

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील आम्रवन महाविहार या परिसराचा विविध कामांच्या माध्यमातून कायापालट करणार असल्याची ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आम्रवन महाविहार परिसरात झालेल्या धम्मदेसना व वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आम्रवन महाविहारामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल, रस्ते विकास व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी पूज्य भदन्त संघरत्ने, विजय वाकळे, सुमेध सुर्यवंशी, युवराज घनसावंत, रवी डासाळकर, माऊली ताटे, दत्तराव नवले, प्रतीक खिल्लारे, सुमनबाई घनसावंत, रोहिदास खंदारे, अमोल वाघ, विशाल चव्हाण, राहुल शिंदे,रमेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!