शेतकऱ्यांसाठी पिककर्ज वाटपाचे यंदा २ हजार २५३ कोटीचे उद्दिष्ट; पिककर्जाचे 15 जुलैपूर्वी नूतनीकरण करावे : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

शेतकऱ्यांसाठी पिककर्ज वाटपाचे यंदा २ हजार २५३ कोटीचे उद्दिष्ट; पिककर्जाचे 15 जुलैपूर्वी नूतनीकरण करावे : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

शेतकऱ्यांनी पिककर्जाचे 15 जुलैपूर्वी नूतनीकरण करावे : परभणी  जिल्ह्यातील पिककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. या पीक कर्जाचे नूतनीकरण वेळेवर केल्यास शून्य टक्के व्याजाने हे पीक कर्ज उपलब्ध होईल. अन्यथा आपणास जास्त व्याज दर भरावा लागेल. त्यामुळे पिककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी 15 जुलैपूर्वी नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

परभणी, दि.04  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024-25 या वर्षासाठी नाबार्डने तयार केलेल्या संभाव्य लिंक योजनेवर आधारित ॲन्युअल क्रेडिट प्लॅन अंमलबजावणीसाठी 25 जून रोजी घोषित केला आहे. या प्लॅनच्या अंमलबजावणीमध्ये पीक कर्जाचे उद्दिष्ट 2129 कोटी (2023-24)वरून 2253 कोटीपर्यंत (2024-25 साठी उद्दिष्ट) वाढविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या उद्दिष्टापेक्षा 124 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5033 कोटी रुपयांची योजना असून, त्यामध्ये केवळ प्राधान्य क्षेत्रासाठी कर्जाचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, एकूण योजना 2024-25 साठी अंदाजे आहे ज्यामध्ये कृषी वित्त आणि संबंधित क्रियाकलाप, बिगरशेती क्षेत्र, गृहनिर्माण कर्ज आणि शैक्षणिक कर्ज आणि इतर समावेश आहे. 2024-25 ची अंदाजे 6396 कोटी रुपये आहे.

नाबार्डने तयार केलेल्या संभाव्य लिंक योजनेवर आधारित ॲन्युअल क्रेडिट प्लॅन अंमलबजावणीचे प्रमुख वैशिष्ट्य पीक कर्जाचे उद्दिष्ट 2129 कोटी (2023-24 चे उद्दिष्ट) वरून 2253 कोटी रुपयांपर्यंत (2024-25 साठी उद्दिष्ट) वाढले आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 124 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याचा अंनुअल क्रेडिट प्लॅन डीसीसी बैठकीमध्ये जिल्ह्याधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.

2024-25 या वर्षासाठीच्या अंनुअल क्रेडिट प्लॅनचे उद्दिष्ट हे कोटीमध्ये असून, पीक कर्ज 2253, कृषी आणि संलग्न क्रियाकलाप (फलोत्पादन, दुग्धव्यवसाय आदि)साठी 1527, एकूण शेती कर्ज 3780, एमएसएमई आणि इतर प्राधान्य कर्ज 1253, एकूण प्राधान्य क्षेत्र कर्ज 5033, प्राधान्य नसलेले क्षेत्र कर्ज 1363, ॲन्युअल क्रेडिट प्लॅन 6396 कोटी रुपयांचा असून, गेल्या वर्षीच्या उद्दिष्टात 2.50 टक्के वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शेतकऱ्यांनी पिककर्जाचे 15 जुलैपूर्वी नूतनीकरण करावे : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी  जिल्ह्यातील पिककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. या पीक कर्जाचे नूतनीकरण वेळेवर केल्यास शून्य टक्के व्याजाने हे पीक कर्ज उपलब्ध होईल. अन्यथा आपणास जास्त व्याज दर भरावा लागेल. त्यामुळे पिककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी 15 जुलैपूर्वी नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज खाते थकबाकीमध्ये गेल्यास क्रेडिट रिपोर्ट खराब होऊन भविष्यात कुठलेही कर्ज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे सहज, सुलभ आणि कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जापासून शेतकरी वंचित राहू शकतात. त्यामुळे पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिककर्ज वेळेत भरून अथवा नूतनीकरण करून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना दीर्घ मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, बचत गटासाठी कर्ज, किंवा इतर कुठलेही कर्ज मिळवताना थकबाकी असल्यास कर्ज मिळवण्याकरिता ती अडचणीची ठरेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. तरी सर्व पिककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी 15 जुलैपूर्वी पिककर्जाचे नूतनीकरण करून घेत परभणी जिल्ह्याच्या प्रगतीस हातभार लावावा. तसेच सर्व बँकानी त्यांचे कॅलेंडर तयार केले असून, बँकेची शाखा गावात येणार आहे. त्यादिवशी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन नुतनीकरणाचा अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!