Scholarship Exam : नूतन विद्यालयाचे 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक; तन्मय भुतडा राज्य गुणवत्ता यादीत 17 वा

Scholarship Exam : नूतन विद्यालयाचे 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक; तन्मय भुतडा राज्य गुणवत्ता यादीत 17 वा

सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत, तर ३१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. इयत्ता पाचवीच्या तन्मय जयकिशन भुतडा याने राज्य गुणवत्ता यादीत १७ वे स्थान मिळविले आहे. शिष्यवृत्तीधारकांमध्ये इयत्ता पाचवीच्या सानवी शितळे, विठ्ठल बोरसे, इयत्ता आठवीतील सक्षम आर्दड, आर्या घांडगे, शार्दूल जोशी, प्रणव घोडके, दर्शना जोशी, प्राची शिंदे, श्रेया द्यावरवार यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सुनील तोडकर, विरेश कडगे, बन्सीधर पद्मावत, आरती कदम, वर्षा कदम, गजानन मुळी, अरविंद अंबेकर, बाळू बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंत्री, नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!