बाल विद्याविहार प्रशालेच्या ११ विद्यार्थ्यांना श्रेया परीक्षेत सुवर्णपदक; शिष्यवृत्ती परीक्षेतही घवघवीत यश
परभणी. श्रेया व शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अंबिका नगर येथील बाल विद्याविहार प्रशालेचा श्रेया परीक्षेचा निकाल १०० टक्के निकाल लागला आहे. परीक्षेला इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील एकूण १३५ विद्यार्थी बसले होते, यापैकी ११ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले असून दोन विद्यार्थ्यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रेया परीक्षेचे समन्वयक म्हणून हनुमंत वझूरकर यांनी काम पाहिले.
पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून यात अंबिका नगरमधील बाल विद्याविहार प्रशालेचे इयत्ता पाचवीतून दोन व आठवीतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीतील श्रेया स्वदेश कदम, अनन्या महेश कुऱ्हे, इयत्ता आठवीतील शिवानी सचिन बाजपेयी, शांभवी विकास खानापूरकर, यशराज चव्हाण यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ.नंदकुमार झरकर, उपाध्यक्ष ॲड.विलास पोहंडूळकर, सचिव डॉ.विवेक नावंदर, सहसचिव ॲड.संजय देशपांडे, विनय नावंदर, ॲड.अशोक सोनी, पवनकुमार झांजरी, मल्हार विहीटकर, डॉ.अनिता विवेक नावंदर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.