आराध्या रोडगेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश; रवळगावच्या जिल्हा परिषद शाळेत सत्कार
सेलू : रवळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आराध्या नितीनज रोडगे या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात आराध्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका मीना वानरे, अशोक वानरे, सरपंच दीपकराव रोडगे, उपसरपंच गजूभाऊ रोडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक, डॉ.सासवडे, सदस्य शिवाजी सरोदे शिक्षक, गावकर्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मोहन कोत्तावार यांनी केले.