शाळांच्या विकासासाठी लोकाश्रय गरजेचा : प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर
सेलूतील राधाबाई कान्हेकर शारदा विद्यालयात गुणवंतांचा गौरव
सेलू (जि.परभणी) : संघर्ष व कठोर परिश्रमातूनच यश प्राप्त होत असते. तरीसुद्धा आधुनिक काळात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ज्ञानमंदिरांमध्ये भौतिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी लोकाश्रयाची नितांत गरज आहे, असे मत प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी व्यक्त केले. सेलू येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात कै.सौ राधाबाई व कै.किशनराव कान्हेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी, ५ जुलैरोजी आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कोठेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, प्रमुख पाहुणे म्हणून जिपचे माजी सभापती अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, जयप्रकाश बिहाणी, डॉ ए.एम.डख, सुनील डख, प्रल्हादराव कान्हेकर, सी.टी.नावाडे, एम. एन.जोशी, प्रा.नागेश कान्हेकर, राधाकिशन जवळेकर, जयसिंग शेळके, साईराज बोराडे, सिध्दूभाऊ खोसे, अनुप देशमुख यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पहिली ते दहावीतील गुणवंतांना स्मृतिचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले. यामध्ये शेख रीहान, कृष्णा गिरी, आकाश सोळंके, यादव कोरडे, कृष्णा कुकडे, दिपक जास्वद, वैष्णवी पाटेकर, अनुराधा मिंड, साक्षी काळे, ज्ञानेश्वरी टिपरकर, रेणुका थोरात, नैतिक महाजन, ओमकार मिंड, संध्या गोरे, यश वैद्य, विनायक मिंड, दिव्या महाजन, राम खाकरे, स्वराज घनवट, राधिका जोगदंड, युवराज पौळ, कृष्णा बेंद्रे यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी अशोक काकडे,संतोष कुलकर्णी, जयप्रकाश बिहाणी, प्रल्हादराव कान्हेकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याबाबत मनोदय व्यक्त केला. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर विजय हिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. राजेंद्र मुळावेकर, संतोष सावंगीकर, बाबा जवळेकर, राम कान्हेकर, लक्ष्मण कान्हेकर, धनंजय कान्हेकर आदींसह विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.आर.साखरे, बी.आर.रोडगे, रोहिदास चव्हाण, संतोष चारठाणकर, अभिमान पाईकराव, संदिप जुमडे, उषा कामठे, सीमा ऊंडे, आनंद देवधर, बाबासाहेब टरपले, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे आदींनी परिश्रम घेतले.